Wednesday, February 1, 2023

नवनीत राणांचे राज ठाकरेंबद्दल मोठं विधान; म्हणाल्या की त्यांनी बाळासाहेबांची….

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हनुमान चालीसाच्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालत असून ते नक्कीच उद्धव ठाकरेंची जागा घेणार असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. एका वृत्तवाहीनीशी त्या बोलत होत्या.

बाळासाहेबांची प्रतिमा फक्त राज ठाकरेंमध्येच पाहायला मिळत आहे. यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची जागा घेणार यात शंका नाही अस नवनीत राणा यांनी म्हंटल. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली आहे पण राज ठाकरेंनी बाळासाहेबांची शिकवण सोडलेली नाही. त्याला धरुनच ते प्रत्येक गोष्टीत लढत आहेत असेही राणा यांनी म्हंटल.

- Advertisement -

बाळासाहेबांनी पदासाठी कधी काम केलं नाही, हिंदू मतांची विचारधारा घेऊन लोकांमध्ये राहिले. त्यांच्यासाठी लढले. जीवाचं रानं केल आणि नेहमी दुसऱ्यांना मुख्यमंत्री कसं बनवता येईल, यासाठी प्रयत्न केले, तसेच त्यांच्या विचारधारेवर चालणाऱ्यांचे समर्थन केले, ते बाळासाहेब होते.