Saturday, March 25, 2023

शिक्षण व्यवस्थेत समन्वयाचा अभाव; निकाल उशिरा लागल्याने सीईटी नोंदणीची संधी हुकली

- Advertisement -

औरंगाबाद | अकरावी प्रवेशासाठी शास्त्र आणि सीईटी परीक्षा जाहीर केली आहे. यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया 2 ऑगस्ट पर्यंत होती. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी जाहीर झाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी प्रक्रिया राहिली आहे. आता अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाने प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य सीईटी दिलेल्यांना असेल असे म्हटल्याने सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नववीच्या गुणांच्या आधारे मूल्यमापन करत दहावीचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय देण्यात आला होता. इतर वेळी परीक्षा घेऊन उत्तरपत्रिका तपासणी सोपे होते. मूल्यांकनाच्या आधारे निकालात उशीर झाला होता. आईसीएससी नंतर राज्य मंडळाची आणि तीन ऑगस्ट रोजी सीबीएससी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले. अकरावी प्रवेशाची घेण्यात येणारी सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्यासाठी अर्ज नोंदणी करिता विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

- Advertisement -

अर्ज नोंदणीसाठी देण्यात आलेले संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आल्यानंतर ही मुदत वाढ करण्यात आली नाही. नियोजित नोंदणीची मुदत आता संपली आहे. या सर्व प्रकारात सीबीएसईच्या अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत अर्ज नोंदणी न केल्याने सीईटीची संधी हुकल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.