Sunday, March 26, 2023

आता तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?; दरेकरांचा खोचक सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून ठाकरे सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी यावरून सरकारला न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी आता तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?,” असा सवाल दरेकर यांनी विचारला आहे.

लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलमधून प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्यावतीने आज मुंबईत रेलभरो आंदोलनही करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी विरोधीपक्षनेते दरेकर म्हणाले कि, लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी!, ही आमची जुनी मागणी आहे. आता न्यायालयाने याबाबत सरकारला सांगितलं आहे.
आम्ही विचारतो, ते राजकारण वाटत असेल, परंतु न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?

भाजपच्यावतीने मुंबईत केलेल्या रेलभरो आंदोलनाबाबत राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबईत विवि ठिकाणी भाजपच्या नेत्यांकडून रेल्वेतून प्रवास करीत आंदोलन केले जात आहे. तसेच यावेळी राज्य सरकारवर निशाणाही साधला जात आहे.