व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लालू यादव यांची प्रकृती गंभीर; आज एअर अँब्युलन्सनं हलवणार दिल्लीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी त्यांना 4 वाजून 30 मिनिटांनी एअर अँब्युलन्सच्या सहाय्याने दिल्लीला नेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

लालू यादव यांच्यावर सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात उपचार केले जात असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला आणले जाणार आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदी, गांधी परिवार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडे विचारपूस केली आहे.

दरम्यान लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लालू यादव यांचा रुग्णालयातील उपचार सुरु असतानाच फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी “माझे हिरो पपा, हर बाधाओं से जिसने पाई है मुक्ति करोड़ों लोगों की दुआएं है जिनकी शक्ति,” असे म्हंटले आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्या प्रकृती स्वास्थासाठी जनतेकडून सध्या प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. लालू प्रसाद यादव काही दिवसांपूर्वी शिडीवरुन पडल्यामुळे जखमी झाले होते. बिहारची राजधानी पाटणा येथील राबरी निवासस्थानी शिडीवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण काही दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागलयानंतर त्यांना पाटणातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.