मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर शिंदे हे मुंबईत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे.

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनही केले. विशलेष म्हणजे शिंदे आणि पवार यांची पवारांच्या मुंबईतील ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते.

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही आमची हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून नैसर्गिक युती आहे. या सरकारला अडीच वर्षे कोणताही धोका नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलदार व मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले. आमच्यामध्ये चांगला समन्वय असून मतभेद होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आमच्या सरकारमागे भक्कमपणे उभे असल्याने सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. आता त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment