ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर दरड कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर (bypass road) आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पनवेलकडून ठाण्याकडे येणारी वाहिनी, मुंब्रा बायपास (bypass road) जवळ टोल नाकापुढे दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती, कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, 1 रेस्क्यू वाहन आणि 1 फायर वाहनासह उपस्थित असून दरडीला बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

दरड कोसळल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने एक लेन बंद ठेवत रेस्क्यू कार्य सुरु केलं आहे. मागच्या चार दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तसेच दरड कोसळण्यासारख्या दुर्घटनासुद्धा घडत आहेत.

चिपळूणमध्ये कुंभार्ली घाटात दरड कोसळली
मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील कुंभार्ली घाटातसुद्धा दरड कोसळली आहे. सध्या त्या ठिकाणी एकेरी वाहतूक चालू आहे. रत्नगिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे डोंगरातून पाणी वाहत असते. यामुळे घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

हे पण वाचा :
‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, घटना CCTVमध्ये कैद

Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!!

कोचिंग क्लासमधील शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

 

Leave a Comment