हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card : संपूर्ण देशात केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (ONORC) लागू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे एका राज्यातील रेशन कार्ड धारकाला देशातील इतर कोणत्याही राज्यातून रेशन घेता येईल. याचा सर्वात मोठा फायदा इतर राज्यात काम करणाऱ्या लोकांना होणार आहे. मात्र, ONORC योजनेचा लाभ फक्त त्याच रेशन कार्ड धारकांनाच मिळू शकेल ज्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले आहे.
म्हणजेच जे Ration Card आधारशी लिंक केलेले नसेल त्या रेशनकार्डवरून दुसऱ्या राज्यात रेशन घेता येणार नाही. रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 30 जून 2022 हा शेवटचा दिवस आहे. यापूर्वी सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत मुदत दिली होती. नंतर ती 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली.
रेशन कार्ड दोन प्रकारे लिंक करता येते
Ration Card आधारशी लिंक करण्यासाठी सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन पर्याय दिले आहेत. लिंक ऑफलाइन आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आधार कार्डची कॉपी, रेशन कार्डची कॉपी आणि रेशन कार्डधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन डेपोमध्ये जमा करावा लागेल. रेशन डेपोमध्ये आपल्या आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन देखील करता येईल.
अशा प्रकारे ऑनलाइन लिंक करा
सर्वांत आधी आधार http://uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर Start Now या पर्यायावर क्लिक करून तुमचा पत्ता भरा.
त्यानंतर राज्य आणि जिल्ह्याची माहिती भरा.
यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ हा पर्याय निवडा.
आता पुढे आधार, रेशन क्रमांक आणि ई-मेल पत्ता भरा.
यानंतर, आधारशी लिंक केलेल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, जो एंटर करावा लागेल.
यानंतर ते दोन्ही लिंक केले जातील. Ration Card
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर पहा
Sachin Tendulkar : 15 वर्षांनंतरही अबाधित आहे सचिनचा ‘हा’ विक्रम !!!
Credit Card चे लिमिट वाढवण्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या
GST कौन्सिलच्या बैठकीत Cryptocurrency बाबत काय निर्णय झाला ??? जाणून घ्या
Investment : मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा