हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lata Mangeshkar Award) बॉलिवूड सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात प्रेक्षकांचे लाडके बिग बी यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन यांच्या कला सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यातच आता मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे दिला जाणारा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा २०२४ चा हा मानाचा पुरस्कार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे.
अमिताभ बच्चन यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ (Lata Mangeshkar Award) दिला जातो. यामध्ये अभिनय आणि कला सृष्टीचा देखील समावेश आहे. या विभागात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाचं ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यासोबत इतर क्षेत्रातीलदेखील काही दिग्गज मंडळींना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे :-
ए आर रहेमान – मास्टर दिनानाथ मंगशेकर पुरस्कार, प्रदीर्घ संगीत सेवेसाठी सन्मानित होणार.
गालिब नाटक – उत्कृष्ट नाटककार २०२३-२४ साठी मोहन वाघ यांना सन्मानित केले जाणार.
दीपस्तंभ फाउंडेशन मोनोबल संस्था – समाजसेवेसाठी आनंदमयी पुरस्कार देऊन सन्मानित करणार.
श्रीमती मंजिरी फडके – प्रदीर्घ साहित्य सेवेकरता वाग्विलासीनी पुरस्काराणे सन्मानित करणार.
रुपकुमार राठोड – व्होकल पुरस्काराने सन्मानित होणार.
भाऊ तोरसेकर – राजकीय पुरस्काराने सन्मानित होणार.
अतुल परचुरे – मास्टर दिनानाथ मंगेशकर थिएटर पुरस्काराचा विशेष सन्मान.
रणदीप हुड्डा – मास्टर दिनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्काराने सन्मानित होणार.
‘लता मंगेशकर पुरस्कार’ (Lata Mangeshkar Award)
दिनांक २४ एप्रिल रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदीन असतो. या दिवशी मंंगेशकर प्रतिष्ठान तर्फे प्रतिवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्यातील दिग्गज व्यक्तींचा सत्कार केला जातो. यावेळी त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाते. गेल्या ३४ वर्षांत २१२ व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
यातच २०२२ पासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (Lata Mangeshkar Award) प्रदान केला जात आहे. हा पुरस्कार सर्वात आधी २४ एप्रिल २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहोत. त्यानंतर २०२३ साली आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर २०२४ मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे.