उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकरची धडक होऊन भीषण अपघात! 7 गाड्या जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यामध्ये अपघातांचे (accident) प्रमाण खूप वाढले आहे. चालकाच्या एका चुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात (accident) होत आहेत. अशीच एक अपघाताची (accident) घटना नाशिकमध्ये घडली. एका डिझेल टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेनंतर मोठा स्फोट होऊन आगीचा मोठा भडका उडाला. हि आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली कि यामध्ये आजूबाजूच्या 7 गाडया या आगीमध्ये जळून खाक झाल्या.या दुर्दैवी घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले.

काय घडले नेमके?
नांदेड महामार्गावर भातखेडा ते भातांगळी या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंधनाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकला. ही धडक इतकी भीषण (accident) होती की धडकेनंतर डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने रस्त्यावरच पेट घेतला. या घटनेमुळे लातूर नांदेड महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती.

या भीषण अग्नितांडवमध्ये एकूण सात वाहनं आगीत जळून खाक झालीत. त्यात एक टँकर, दोन ट्रॅक्टर, एक एसटी बस आणि एका ट्रकचा समावेश आहे. या अपघातात (accident) सात वाहनं एकाच वेळी पेटल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. या अपघातातील जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय