ब्राह्मण हिंदू नाहीत ते तर… ; लक्ष्मण माने यांचे वादग्रस्त विधान

Laxman Mane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा. शरद पवार यांनी केलेल्या भाषणामध्ये जवाहर राठोड यांच्या कवितेचा संदर्भ देताना केलेल्या वक्तव्यावरून विविध आरोप-प्रत्यारोप होत असताना आता साताऱ्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी हिंदू आणि ब्राम्हण वर्गावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ब्राम्हण हे हिंदू नाहीत, त्यांनी स्पष्ट करावे कि ते वैदिक आहेत कि हिंदू आहेत. आणि ते हिंदू असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जातीच्या दाखल्याचे पुरावे द्यावेत कि ते हिंदू आहेत, असे वादग्रस्त विधान माने यांनी केले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/326440029657597

लक्ष्मण माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खा. शरद पवार यांच्या त्या वक्तव्याचे समर्थन करत आक्षेप घेणाऱ्या भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. यावेळी माने यांनी म्हंटले की, ब्राम्हण स्वतःला हिंदू समजत नाहीत, ते कधीही मूर्ती पूजत नाहीत, त्यांच्या देव्हाऱ्यावर मूर्ती नसून त्यांच्या लग्नात देखील मूर्ती पूजा होत नाही. ब्राम्हण हे अहिंदू आहेत आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असेही माने म्हणाले.

मंदिरातील दानपेटीतील अब्जवधीचे सोने हे ब्राम्हणांकडे आहे. सरकारने देखील गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ब्रिटिशांनी तोडा फोड आणि राज्य करा, ची रणनीती आता ब्राम्हण अवलंबत आहेत. त्यामुळे हिंदूंनी जागृत होण्याची गरज असल्याचेही लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे.

हिंदू हि एक शिवी असून त्याचा अर्थ चोर, लुटेरु असा होतो

यावेळी लक्ष्मण माने यांनी हिंदू शब्दाच्या मागील असलेला अर्थ सांगितला. ते म्हणाले की, १३ व्या शतकापर्यंत हिंदू हा शब्द नाही. मात्र, १८६१ साली हिंदू हा शब्द अस्तित्वात आला. खरतर हिंदू हि एक शिवी असून त्याचा अर्थ चोर, लुटेरु, गुन्हेगार असा होतो आणि मुस्लिमांनी हा शब्द अस्तित्वात आणला आहे. ब्राम्हण सध्या सर्वकाही हातात घेण्यासाठी धडपडत आहेत, त्यामुळे बहुजनांनी सावध होण्याची गरज आहे.