हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणली. बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत शिंदे गटातील एका मंत्र्याने आपण कर्नाटकला जाण्याचा इशारा दिला आहे. शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी आपण उद्याच बेळगाव सीमेवरील गावात जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नी चर्चा करण्यात आली. मात्र, बेळगाव येथील सीमेवर असलेले शिनोळी हे गाव असून त्या ठिकाणी मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण जाणार आहे.
बेळगावपासून अगदी जवळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात ते उद्या शुक्रवारी मंत्री शिंदे जाणार आहेत. आता याबाबत महाविकास आघाडीतील नेत्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पहावे लागणार आहे.