महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवलाय : मनसेचा आरोप

जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  : कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सवरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता मनसेनेही उडी घेतली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा केवळ भाजपकडेच नव्हे तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडेही आहे, असा आरोप मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे.

अखिल चित्रे यांनी यासंदर्भात ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना लक्ष्य केले. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा मविआ आमदारांकडेही आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी त्याचे वाटपही करत आहेत. नवाब मलिक यांनी याबाबतही जरा बोलावे. तुमचे राजकारण बंद करा, जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाहीत, भाजपच्या नेत्यांवर गुन्हा करा: आम आदमी पक्ष राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या पुरवठ्यावरुन महाविकासआघाडी सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता आम आदमी पक्षाने (आप) उडी घेतली आहे. कोणताही राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ‘आप’च्या नेत्या प्रिती शर्मा यांनी केली आहे.

रेमडिसिवीरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात माणसं मृत्यूमुखी पडत असताना भाजपा रेमडिसिवीरचा जो पुरवठा करत आहे त्याचा आप पक्ष निषेध करतो. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की, भाजप नेते प्रसाद लाड हे भाजपच्या बाजूने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्मा यांना भेटून आले. या करता त्यांनी रेमडिसिवीरच्या आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारचा वापर केला. तीच ताकद वापरून भाजपा ने ब्रुक फार्म यांच्याकडून रेमडिसिवीरचा स्टॉक विकत घेतला. राजकीय पक्ष हे इलेक्शन कमिशनला रजिस्टर असतात, चॅरिटी कमिशनला नाही. कोणत्याही प्रकारच्या डोनेशनसाठी एखाद्या पक्षाने ड्रग्ज, औषधं विकत घेणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे, असे प्रिती शर्मा यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

You might also like