हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी स्वतःला मोदींचा हनुमान म्हणणाऱ्या चिराग पासवान यांना NDA सोडून RJD मध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिराग पासवान यांच्या लोजप मध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. त्या पार्शवभूमीवर तेजस्वी यादव यांनी चिराग याना ऑफर दिली आहे. त्यामुळे बिहार मधील राजकारणात तर्क वितर्कांना उधाण आले आहे
एलजेपीच्या बंडखोरीचा सूत्रधार कोण आहे हे सर्वांना माहित आहे असं म्हणत तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार आणि भाजपवर निशाणा साधला. चिराग याना आता स्वतःलाच स्वतःची दिशा ठरवायला हवी असेही तेजस्वी यादव यांनी म्हंटल. तसेच २०१० मध्ये एलजेपी जवळ खासदार आणि आमदार नव्हते तेव्हा लालु प्रसाद यांनी रामविलास पासवान यांना राज्य सभेत पाठविल्याचेहि तेजस्वी यांनी लक्षात आणुन दिले.
लोजप मधील बंडखोरी बद्दल नितीश कुमार याना विचारलं असता त्यांनी म्हंटल होत कि मला याबाबत काहीही माहिती नाही त्याचाही तेजस्वी यादव यांनी समाचार घेतला. तेजस्वी म्हणाले कि नितीश कुमार याना काहीही माहिती नसते त्याना क, ख, ग, पण माहिती नसते. बिहार बेरोजगारी चे केंद्र बनत आहे ते पण नितीश कुमार याना माहूत नाही कारण ते कधीही वर्तमानपत्र वाचत नाही असं म्हणत सर्वाना माहित आहे कि लोजप कोणी फोडली असं म्हणत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला