हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे निष्ठावान राहिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मध्यप्रदेशच्या राजकारणात खळबळ माजलेली असताना ज्योतिरादित्य यांच्या पक्षात नसण्याचा काही परिणाम होणार नाही. असं मत काँग्रेस आमदार अर्जुन सिंग यांनी व्यक्त केलं आहे. कमलनाथ सरकार १६ तारखेला आपलं बहुमत सिद्ध करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान गेल्या 15 वर्षांपासूनचे भाजपचे सरकार उलथवून काँग्रेसने काठावर बहुमत मिळवत मध्यप्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, कमलनाथ यांचे सरकार अल्पायुषी ठरताना दिसत आहे. कारण काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केली असून 6 मंत्र्यांसह 17 आमदारांना कर्नाटकात नेऊन ठेवले आहे. तर सिंधिया गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मोदींना भेटून नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यांनी काँग्रेसचा राजीनामाही दिला आहे.