हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण दिवसाची सुरुवात चहानेच करतो. पण दुधाच्या ऐवजी तुम्ही जर लेमन टीचे (Lemon Tea) सेवन केलं तर तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. लेमन टी म्हणजेच लिंबू चहामध्ये व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ई, थायामिन, नियासिन यांसारखे शरीराला पोषक असणारे घटक आढळतात, त्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. चला आज आपण जाणून घेऊया लेमन टिचे काही आरोग्यदायी फायदे….
1) वजन नियंत्रणात ठेवते-
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचं असेल तर रोज लेमन टीचे सेवन करा. शरीर डिटॉक्स करण्यासाठी याची मदत होते. लिंबूमध्ये असलेले गुणधर्म तुमची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. याशिवाय, लेमन टीमधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.
2) सर्दीसाठी उपयुक्त –
सर्दी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लेमन टीचे सेवन खूप फायदेशीर ठरते. लेमन टीमध्ये आलं टाकून दिवसातून ३-४ वेळा प्यायल्याने सर्दी बरी होते. तसंच घशात खवखव होत असेल तरीही या चहामुळे दुर होवू शकते. लेमन टीमध्ये मध घालून प्यायल्याने श्वसनाचे आजार सुद्धा होत नाहीत.
3) पचन तंत्र-
लेमन टी पिल्याने पचन तंत्र सुधारते. सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकांना अॅसिडिटीची त्रास असतो. त्यामुळे अशा लोकांनी अॅसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लेमन टीचे सेवन करावे.
4) त्वचेसाठी फायदेशीर-
लेमन टी पिल्याने आपली त्वचा निरोगी राहते. विशेषत: या चहाने त्वचेवरील मुरुम, मुरुम आणि सुरकुत्याची समस्या दूर होऊ शकते. तसेच लेमन टीमध्ये मध आणि साखर मिश्रित करून दररोज प्यायल्याने चेहरा तजेलदार दिसतो.
5) रोग प्रतिकारशक्ती वाढते-
लेमन टी मध्ये व्हिटॅमिन सी सारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असते ज्याचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. चहाच्या पातींमध्ये असलेल्या फ्लेव्होनोइड्स आणि अँटिऑक्सिडेंट्समुळे इम्युनिटी वाढवण्यास खूप मदत होते.