गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोली भागातील कोरची भागात सध्या बिबट्याने हैदोस घातला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक नरभक्षक वाघ व 1 बिबट्याने हैदोस घातलेला आहे. आज कोरची मार्गावर बिबट्याने हल्ला (leopard attack) करून एका दुचाकीस्वाराला जखमी केले आहे. तसेच दुसऱ्या घटनेत आज पहाटे बिबट्याने (leopard attack) नागपूरवरून गडचिरोली कोरचीकडे येणाऱ्या पेपर गाडीवर हल्ला केला. या पेपर गाडीच्या चालकाला उजव्या बाजूला दुखापत झाली असून गंभीर जखमी झाला आहे. या चालकावर प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या दोन घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंगलाच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकावर बिबट्याचा थरारक हल्ला pic.twitter.com/9lupZdaAu0
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 17, 2022
काय घडले नेमके ?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, दुचाकीचालक गाडीने जंगलाच्या रस्त्यातून जात आहे. समोरून आधीच एक दुचाकी गेली. त्यापाठोपाठ दुसरी दुचाकी जात आहे. अचानक बिबट्याने (leopard attack) उंच झेप घेतली आणि त्या गाडीचालकाच्या अंगावर तुटून पडला आणि तसाच पुढे जंगलात निघून गेला. या बिबट्याच्या हल्ल्याने तो दुचाकीचालक गाडीवरून खाली पडला आणि जखमी झाला. या घटनेमुळे लोकांमध्ये वन्यप्राण्यांची भीती अधिक वाढली आहे.
यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच दुसऱ्या एका घटनेत देसाईगंज तालुक्यात वाघाने हैदोस घातला. नरभक्षक वाघामुळं नागरिक हैराण आहेत. आरमोरी तालुक्यातही वाघाने दोघांचा जीव घेतला आहे. त्यामुळं या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी अशीदेखील मागणी करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार
…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर
अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं