सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर सातारा राष्ट्रवादी महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने हा धमकीचा फोन केला असल्याचा आरोप युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी केला असून धमकी देणाऱ्यास घरात घुसून मारणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी चोख शब्दांत खडेबोल सुनावल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून सक्षणा सलगर यांना धमकी दिली होती. याबाबतची माहिती स्वतः सक्षणा यांनी ट्विट करून दिली.
मला आज सायंकाळी 06:14 वा.
99 223 000 38 या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता .ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.@CMOMaharashtra @OsmanabadPolice @Jayant_R_Patil @supriya_sule @DGPMaharashtra— Sakshna Salgar (@SakshnaSalgar) July 3, 2021
दरम्यान सक्षणा यांना धमकीचा फोन आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दिला. त्यांनतर सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट पत्रकार परिषद घेत गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने हा धमकीचा फोन केला असल्याचा आरोप केला असून धमकी देणाऱ्यास घरात घुसून मारणार असल्याचे म्हंटले आहे.