“ओबीसी आरक्षणाची लढाई देशभर नेऊ” – मंत्री विजय वडेट्टीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

देशातील ओबीसी समाजाची सद्यस्थितीत बिकट अवस्था आहे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, नोकरी, तसेच राजकारणासाठी आरक्षण मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी लढाई सुरू केली आहे. ही लढाई देशभर घेवून जाणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत केले.

घटनेने दिलेला हक्क मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसून ओबीसांनी एकसंघ व्हावे, असे आवाहन केले. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होवू देणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. सांगलीत स्टेशन चौक येथे ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या ओबीसी आक्रोश परिषदेत मंत्री वडेट्टीवार बोलत होते.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले,” मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आम्ही त्यांच्या विरोधात नाही. पण ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. घटनेने ओबीसांनी 27 टक्के आरक्षण दिले आहे. पण 52 टक्कयावर घालवून ते संपविण्याचे कारस्थान केले जात आहे. प्रसंगी घटना दुरुस्ती करा, 50 टक्यावर घेवून जावा. 70-80 टक्के करा, सर्वांना आरक्षण दया, त्याला आमचा विरोध नाही.” आमच्या हिश्यातील देवू देणार नाही. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत घुसखोरी होवू दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Comment