डियर नीता भाभी और मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है ; अंबानींना धमकीच्या पत्राने खळबळ

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतल्या अल्टामाऊंट रस्त्यावरील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांची कार आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. या गाडीची बॉम्ब शोध पथकानं तपासणी केली असून यातून २० जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या आहेत. तसेच या कारमध्ये धमकीचे पत्र देखील आढळून आले आहे. या प्रकारानंतर मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सुरक्षेत वाढ झाली आहे.

गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये काय लिहले होते?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here