कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकाला कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. आतापर्यंतच्या ब-याच केसेसमध्ये सिद्ध झाले आहे. तेव्हा या बाबत सहानुभूती पूर्वक विचार करून कराड शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध कराव्यात, अशी विनंती थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी केली आहे.
नगराध्याक्षा रोहीणी शिंदे पत्रात म्हटल्या आहेत की, सध्या संपूर्ण देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रातही या महामारीचा सर्वाधिक प्रकोप सध्याच्या काळामध्ये झालेला आहे. याचा ताण शासन, प्रशासन यासह आरोग्य यंत्रणांना सुद्धा बसत आहे. कोरोना बाधित रुग्णांना हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजन, व्हेन्टीलेटर या सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत. अपु-या आरोग्य यंत्रणेमुळे रुग्णांची गैरसोय होऊन प्रचंड हाल होत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे स्प्रेडेशन वाढत असून असंख्य नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. व असंख्य रुग्णांचे संपूर्ण कुटुंबीय सुद्धा कोरोना बाधित होत आहेत.
या सगळ्या परीस्थीतिचा विचार करता १०० टक्के लसीकरण करणे, लसीकरणाचा वेग बाढवणे हे खूप महत्वाचे आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकाला कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. अशा नागरिकास कोरोना झाला तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे. आणि हे आतापर्यंतच्या ब-याच केसेसमध्ये सिद्ध झाले आहे.
कराडला लसींचा पुरेसा साठा द्यावा
माझी आपणास कळकळीची विनंती आहे कि, सर्व वयोगटातील नागरिकांना (१८ ते ४४) व (४५ व त्यापुढील सर्व) लसीकरण होणेकामी पुरेश्या प्रमाणात लसींचा डोस प्रत्येक आरोग्य केंद्रावर उपलब्ध करून देण्यात यावा, याबाबत शासनाने आपले सर्व अधिकार वापरून सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी. या गंभीर संकटाच्या वेळी सरकारने नागरिकांचे पालक म्हणून जेवढे शक्य आहेत ते सारे प्रयत्न करून पुरेसा लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा. जेवढे जास्त लसीकरण वेगाने होईल तेवढा या महामारीपासून आबालवृद्धांचा बचाव होणार असून मृत्युदारही कमी होणार आहे. जिवावरच्या संकटाच्या काळात आज प्रत्येक नागरिक आपले लसीकरण कधी होईल याकडे डोळे लावून बसला आहे. तरी या बाबत सहानुभूती पूर्वक विचार करून कराड शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी हि विनंती.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba
Click Here to Join Our WhatsApp Group