LIC Jeevan Pragati Plan : LIC च्या ‘या’ योजनेत रोज 200 रुपये जमा केल्यास मिळतात 28 लाख रुपये; कसे? जाणून घ्या

LIC Jeevan Pragati Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Jeevan Pragati Plan) आजकाल पैसा हा जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याची समज प्रत्येकाला आली आहे. पण फक्त पैसा असून चालत नाही. तर त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे देखील गरजेचे असते. त्यामुळे अनेकांचा गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. गुंतवणूक करायची म्हटली कि उत्तम आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेतला जातो. यामध्ये बहुतेक लोक सुरक्षा आणि चांगल्या परताव्यासाठी LIC ला पसंती देतात. आज देशभरातील अनेक गुंतवणूकदार हमखास स्वरूपात LIC च्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात.

LIC देखील आपल्या ग्राहकांसाठी कायम विविध योजना राबवित असते. वेगवेगळ्या उत्पन्न गटांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना गेल्या काही काळात सुरू करण्यात आल्या आहेत. (LIC Jeevan Pragati Plan) यातील एका खास योजनेविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये नियमित स्वरूपात केवळ २०० रुपये जमा केल्यास तुम्हाला २८ लाख रुपये मिळतील. या योजनेचे नाव ‘जीवन प्रगती योजना’ असे आहे. चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया.

LIC जीवन प्रगती योजना (LIC Jeevan Pragati Plan)

LIC ची ‘जीवन प्रगती योजना’ अत्यंत खास, फायदेशीर आणि सुरक्षित योजना म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळात अनेक लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. या योजनेत पैसे गुंतवण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे येथे तुम्ही गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते.

कोण करू शकतो?

LIC जीवन प्रगती योजनेत वयाच्या १२ वर्षापासून गुंतवणूक करता येते. तसेच जास्तीत जास्त ४५ वर्षांपर्यंतचे लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. (LIC Jeevan Pragati Plan)

कालावधी आणि रक्कम

या योजनेत ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी किमान २० वर्षांसाठी गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. अर्थात दरमहा ६ हजार रुपये जमा करावे लागतील. आणखी सोप्प करून सांगायचं झालं तर गुंतवणूक दारास नियमित २०० रुपये जमा करावे लागतील.

महत्त्वाची कागदपत्रे

LIC जीवन प्रगती योजनेचा भाग व्हायचे असेल तर यासाठी अकाउंट लिंक होणे गरजेचे आहे. योजनेच्या स्क्रीनशी लिंक करण्यासाठी अर्जदाराने खाली दिलेली महत्वाचे कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. (LIC Jeevan Pragati Plan)
आधार कार्ड,
पॅन कार्ड,
पासपोर्ट आकाराचा फोटो,
वैयक्तिक मोबाइल क्रमांक,
बँक पासबुक इ.

असा अर्ज करा

LIC जीवन प्रगती योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर LIC कार्यालयात जाऊन अर्ज घ्या. तो योग्यरित्या भरा आणि वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडून प्रीमियमची रक्कम आणि सोबतच अर्ज जमा करावा.

असे मिळतील २८ लाख रुपये

LIC च्या या योजनेत असे गृहीत धरले जाते की गुंतवणूकदार दररोज २०० रुपये जमा करत आहे. त्यानुसार, संपूर्ण महिन्यात त्याच्याकडे ६ हजार रुपये जमा होतात. (LIC Jeevan Pragati Plan) तर वर्षभरात ७२ हजार रुपये जमा होतात. त्यात २० वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल तर तुमची एकूण गुंतवणूक १४ लाख ४० हजार इतकी होईल. यानुसार तुम्हाला या योजनेतून एकूण २८ लाख रुपयांचा निधी मिळेल.