जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी LIC रिटर्नच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । LIC आपला IPO शेअर बाजारात आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मार्चपर्यंत हा IPO येण्याची शक्यता आहे. दरम्यान, क्रिसिलने कंपनीच्या रिटर्नच्या संदर्भातील रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्ट्स नुसार, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ही केवळ होम-मार्केट शेअरमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी नाही तर रिटर्न ऑन एसेट्स मध्येही नंबर-1 कंपनी आहे.

2020 पर्यंत, ग्रॉस रिटेल प्रीमियममध्ये LIC चा वाटा 64.1% होता. तर कंपनी रिटर्न ऑन एसेट्स (RoE) मध्ये 82% रिटर्न देत आहे. यासह, लाइफ इन्शुरन्स प्रीमियमच्या बाबतीत LIC ही जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

मार्केट शेअर मध्ये घसरण
मात्र, गेल्या काही वर्षांत LIC चा बाजारातील हिस्सा कमी होत आहे. 2000 पूर्वी कंपनीचा बाजारातील हिस्सा 100% इतका होता. 2016 पर्यंत ते 71.8% आणि 2020 पर्यंत 64.1% पर्यंत खाली आले आहे. तसे, या कालावधीत SBI Life चा मार्केट शेअर वाढला आहे.

SBI Life चा बाजारातील हिस्सा वाढला
SBI Life ही देशातील दुसरी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. क्रिसिलच्या रिपोर्ट नुसार, 2016 मध्ये SBI Life ची हिस्सेदारी केवळ 5% होती, जी 2020 मध्ये 8% पर्यंत वाढली आहे. CRISIL ने नोव्हेंबर 2021 मध्ये हा रिपोर्ट तयार केला होता मात्र तो सार्वजनिक करता आला नाही.

LIC चा ग्रॉस रिटेल प्रीमियम (GWP) 64.1% म्हणजेच $56.405 अब्ज आहे. रिपोर्ट नुसार, जगातील कोणत्याही विमा कंपनीचा इतका बाजारातील हिस्सा नाही.

जगातील टॉप 10 विमा कंपन्या
भारतीय कंपनी LIC चा देखील जगातील टॉप 10 विमा कंपन्यांमध्ये समावेश आहे. या लिस्ट मधील 5 विमा कंपन्या चीनमधील असून, पिंग हा जगातील सर्वात मौल्यवान इन्शुरन्स ब्रँड आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील दोन आणि फ्रान्स, जर्मनी आणि भारतातील प्रत्येकी एका कंपनीचा सहभाग आहे. LIC, जो भारतातील सर्वात मोठा शेअर विक्रेता होणार आहे, हा देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा ब्रँड आहे ज्याचे मूल्य $8.656 अब्ज (सुमारे 64,722 कोटी रुपये) आहे. यासोबतच हा जगातील तिसरा मजबूत विमा ब्रँड आहे, असे एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

Leave a Comment