हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी फायद्यात असलेली आणि सर्वात जुनी व विश्वसनीय विमा कंपनी मानली जाते. देशातील जास्तीत जास्त लोक या विमा कंपनीचा पर्याय निवडतात. LIC योजनेत गुंतवणूक करणे हे भारतातील लोकांना विश्वसनीय वाटते, त्यामुळे इथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. LIC मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळणारा रकमेचा परतावा जास्त असणार आहे. LIC च्या अशा अनेक योजना आल्या आहेत, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करतात आणि निश्चित रहातात. LIC Policy मध्ये असा एक प्लान आहे की, ज्यामध्ये पती – पत्नीला गुंतवणूक करता येते आणि मिळणाऱ्या रकमेचा परतावा जास्त प्रमाणात आहे. कोणता आहे हा प्लान ते आपण पाहणार आहोत.
पती –पत्नीसाठी आलेल्या या लाभदायक LIC च्या योजनेचे नाव आहे ‘जीवनसाथी विमा योजना’. या योजनेत, पती – पत्नीने गुंतवणूक केल्यानंतर दोघांना एका प्रीमियममध्ये वेगवेगळ्या मॅच्युरिटी मिळण्याची सोय उपलब्ध आहे. पती – पत्नीमधील एकाची अनुपस्थिती असल्यास दुसऱ्याला प्रीमियम भरण्याची गरज भासत नाही. मात्र इथे हा लाभ आहे की, पॉलिसीच्या शेवटी दोन मॅच्युरिटी देण्याची सोय एलआयसीने दिली आहे. पती – पत्नीपैकी एकजण उपस्थित नाही, तरीही LIC एकरकमी रक्कम देण्याची सोय उपलब्ध करून देते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील महत्वाचे खर्च भागवण्यासाठी एलआयसी तुम्हाला प्लानद्वारे काही रक्कम उपलब्ध करून देतात.
आयुर्विम्यामध्ये महिला जास्त प्रमाणात पॉलिसी उघडत नसल्याचे दिसते. महिलांच्या अनुपस्थितीत प्रीमियम भरण्याची चिंता असल्यामुळे लोक हा धोका स्वीकारत नाहीत. एलआयसीच्या ‘जीवन साथी पॉलिसी’ मध्ये दोघांचे विम्याचे हप्ते योग्य रीतीने भरले असले तर जोडीदाराच्या अनुपस्थितीत दुसऱ्या व्यक्तीला प्रीमियम भरण्याची आवश्यकता भासत नाही.
पॉलिसीचा फायदा कुणासाठी ?
ज्या व्यक्तीचे वय 18 आणि 50 आहे, त्यांचा या योजनेत समावेश केला जातो. गुंतवणुक कमीत कमी 13 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षांकरिता करता येते.
पॉलिसीचे मिळणारे लाभ
पती – पत्नी हे दोघेजण पॉलिसीचे हप्ते भरत असताना जोडीदाराच्या अनुपस्थितीत दुसऱ्या व्यक्तीला 5 लाख रुपये देण्याची सोय या पॉलिसीत आहे. जोडीदाराच्या अनुपस्थितीत आगामी दरमहा 3600 रुपयांचे सर्व प्रीमियम्स रद्द होतात. दरवर्षी दुसऱ्या जोडीदारास LIC मधून 50 हजार रुपये रक्कम मिळू शकते. 25 वर्षे पॉलिसीचे हप्ते भरले तर मुदतीनंतर जोडीदाराला 27 लाख रुपये मिळण्याची सोय या प्लानमध्ये आहे.कमीत कमी 18 वर्ष वयाचे तर जास्तीत जास्त 50 वयोमान असलेले लोक ही पॉलिसी घेऊ शकतात.ही पॉलिसी घेण्याची किमान मुदत 13 वर्षे आहे तर कमाल 25 वर्षे आहे. ‘जीवनसाथी विमा योजना’ ही विमा पॉलिसी ज्या मुदतीची आहे, त्यापेक्षा 3 वर्षे कमी हप्ते भरावे लागणार आहेत.