हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन संपल्यानंतर सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे जेणेकरुन कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येईल. मात्र, हे लक्षात ठेवा की कोणतीही महत्त्वाची कामे ही वेळेवरच पूर्ण करा. हे लक्षात घेता भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) मॅच्युरिटी क्लेमच्या सेटलमेंटचे नियम शिथिल केले आहेत. या सरकारी विमा कंपनीने आपल्या वेबसाइटवर याबाबतची माहिती देताना सांगितले की, कोणताही पॉलिसीहोल्डर ईमेलद्वारे आपल्या क्लेमचे डॉक्युमेंट्स पाठवू शकतात.
यासंदर्भात एलआयसीने सांगितले की, सर्व पॉलिसीहोल्डर्स केवायसीसह आपल्या डॉक्युमेंट्सच्या स्कॅन केलेल्या कॉपीज ३० जूनपर्यंत सर्व्हिसिंग शाखेत पाठवू शकतात, जेणेकरून त्यांना त्यांची मॅच्युरिटी किंवा सर्वाइवल क्लेम मिळू शकेल. चला तर मग त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.
१. आपण आपले डॉक्युमेंट्स claims.bo<Branch code>@licindia.com वर पाठवू शकता. यामध्ये आपल्याला ब्रँच कोडऐवजी आपला सर्व्हिसिंग ब्रँच कोड भरावा लागेल. हे काम आपल्याला ३० जूनपूर्वीच करावे लागेल.
२. एका मेलवर तुम्ही जास्तीत जास्त ५ एमबीचेच डॉक्युमेंट्स पाठवू शकाल. यापेक्षा जास्त साठी आपण एकापेक्षा जास्त मेल पाठवू शकता.
३. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्कॅन केलेली कॉपी जेपीजी किंवा पीडीएफ स्वरूपात असावी जेणेकरून ती सहजपणे वाचता येईल.
४. आपण हा मेल आयडी केवळ क्लेम संबंधित गरजांसाठी वापरु शकाल. या आयडी वर इतर कोणत्याही कामासाठी मेल पाठवता येणार नाही.
ऑनलाइन क्लेमसाठी आपल्याला कोणत्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता असेल?
>> पॉलिसी बाँडचे पहिले आणि शेवटचे पेज
>> डिस्चार्ज फॉर्ममधील सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर स्कॅन करावे लागेल.
>> नॉन-असाइनमेंट संबंधित फॉर्म क्रमांक ३५१० डिक्लेरेशन
>> एनईएफटी नसेल तर तुम्हाला एनईएफटी मॅण्डेट आणि कॅन्सल चेकची एक कॉपी द्यावी लागेल.
>> केवायसी डॉक्युमेंटमध्ये आयडी प्रूफ, पत्ता आणि पॅन कार्ड
>> पॉलिसीहोल्डर्सना मेलमध्ये त्यांचे मोबाइल नंबरदेखील द्यावे लागतील.
>> आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हा मेल क्लेमसाठी पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.