हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ८ एप्रिल रोजी आपल्याला २०२० सालचा सर्वात मोठा चंद्र दिसेल. हा सुपर गुलाबी चंद्र किंवा सुपर पिंक मून जो वसंत ऋतूतला पहिला पूर्ण चंद्र असेल. तो रात्रीच्या आकाशात चमकताना दिसणार आहे.पण दुःखद बाब हि आहे की हि खगोलीय घटना भारतीय लोकांना पाहता येणार नाही, कारण ती सकाळी ०८:०५ वाजता दिसून येईल आणि त्यावेळी आपल्याकडे सूर्यप्रकाश खूपच तीव्र असेल. तथापि, आपण लाइव स्ट्रीमिंगद्वारे ते पाहू शकतो.
सुपर पिंक मून म्हणजे काय ते जाणून घ्या?
सुपरमून ऑर्बिट पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर सहसा ३८४,४०० किलोमीटर असते. परंतु ८ एप्रिल रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. ज्यामुळे चंद्र खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो.८ एप्रिल रोजी, सुपर पिंक मून आपल्या ग्रहापासून ३,५६,९०७ किलोमीटर अंतरावर असल्याची नोंद झाली आहे. पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून घडण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक वेळी असे होणे आवश्यक नाही.
त्याला पिंक मून का म्हणतात?
बरेच लोक असा विचार करतात की या दिवशी चंद्राचा रंग गुलाबी होतो. ज्यामुळे ते या नावाने ओळखले जाते. पण असं काही नाहीये, अमेरिकेत बहरत असंलेले गुलाबी फुल ‘Phlox Subulata’ वसंत ऋतू मध्ये फुलतो. म्हणूनच एप्रिल महिन्यातील पौर्णिमेला गुलाबी चंद्र म्हणून संबोधण्याची परंपरा आहे. या कारणास्तव, सन २०२० मध्ये पडणार्या सुपर मूनला या नावाने ओळखले जात आहे.
सुपर मून कोठे पहायचा
भारतात,८ एप्रिल रोजी सकाळी ०८:०५ वाजता होईल. त्या वेळी सूर्याच्या जास्त प्रकाशामुळे आपण पाहू शकणार नाही. तर आपण हे Sloohच्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहजपणे पाहू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.