औरंगाबाद | पोलीस निरीक्षकाच्या मुलाने वडिलांच्या ट्विटर खात्यावर वर्क फ्रॉम होमची जाहिरात पाहून संबधित मोबाईलवर संपर्क साधला मात्र ते भामट्याने टाकलेले ऑनलाईन जाळे होते. या जाळ्यात दीड लाखांना गंडा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 15 ते 22 जून या काळात घडली अमित राय असे आरोपीचे नाव आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रशांत बोंडेकर यांच्या पत्नी सुकन्या ( रा. एन 8 टीव्ही सेंटर हडको) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांच्या मुलाचे ऑनलाईन क्लासेस सुरू होते. त्यासाठी तो प्रशांत यांचा मोबाईलवर त्यांची ट्विटर खाते वापरत होता. त्यावेळी त्याला वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसली. त्यातील चॅट बॉक्समध्ये मुलांने वर्क फ्रॉम होमसाठी नोंदणी करायचे आहे असा. मेसेज पाठवतात त्याला भामट्याचे लगेच उत्तर आले म्हणून तुम्हाला फोन वर्क फ्रॉम होम करायचे असेल तर मी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा त्यातून तुम्हाला प्रत्येक लिखला 120 ते 200 रु मिळतील या कामासाठी जॉईन होण्यासाठी अगोदर 999 रुपये भरावे लागतील असे सांगितले. तसेच पैसे भरण्यासाठी ट्विटरवर एक मेसेज केला. त्यानंतर प्रशांत यांच्या ट्विटवर भामट्याने अमित राय असे नाव असलेले एसबीआय बँकेचा खाता पाठविला.
प्रशांत यांच्या मुलाने पेटीएम मधून भामट्याने दिलेल्या बँक खात्यावर सुरुवातीला 999 रुपये पाठविले. त्यावर पुन्हा व्हाट्सअप मेसेज आला त्याने त्यात तुमचे रजिस्ट्रेशन झाले असून सुरक्षा ठेवी करिता 4,999 रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे मुलाने पुन्हा पेटीएमद्वारे पैसे पाठविले. पुढे 16 जून रोजी व्हाट्सअप मेसेज पाठवला तर तुमची सुरक्षा ठेव प्राप्त झाले असून तुम्हाला पॅकेज खरेदी करावे लागेल. त्यासाठी यूपी आयडीवर 6,399 रूपये व 2 हजार 699 असे एकूण 8हजार 999 पाठवावे लागतील, असे सांगितले. त्यावेळी त्याने ट्विटरवर गुगल पे आयडी प्रवीण कुमार सिंग या नावाने पाठवला त्या आयडिवर मुलाने 17 जून रोजी पेटीएमद्वारे पैसे पाठविले मात्र पुन्हा 18 जून रोजी भामट्याने अॅप व लिंक तयार करण्यासाठी पुन्हा 25 हजार रुपये, 19 जून रोजी भरलेले पैसे रिफंड कार्ड खरेदी करणे हजार रुपये खात्यावर पैसे मागविले. ते देखील प्रशांत यांच्या मुलाने पाठवले मात्र वाट पाहूनही पैसे आलेच नाही.