देशातील सर्वात सुरक्षित बँकाची यादी समोर; पहा RBI ने नेमकं काय म्हंटल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकिंगवर नियंत्रण ठेवते. देशातील बँकांमध्ये आर्थिक अनियमिततेवर लक्ष ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेने देशाच्या अडचणीच्या काळात केंद्र सरकारला आर्थिक मदतही देऊ केली आहे. देशातील नागरिकांना बँकेच्या कक्षेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येक घरातील एका तरी सदस्याचे बँक अकाऊंट आहे. बँकेत अकाऊंट उघडल्यामुळे नागरिकांना व्यवहार करणे सोपे झाले. यात ऑनलाइन, ऑफलाईन व्यवहार आहेत. तसेच बँकांमध्ये लोक पैसा ठेवू लागले. असे असताना काही बॅंका, सहकारी बॅंका अचानकपणे बंद पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे लोकांना नेमक्या कोणत्या बँकेत कमाईची रक्कम ठेवायची हे सुचत नाही. लोकांचा हा संशय मिटवण्याचे काम भारतीय रिझर्व्ह बँकेने केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचना लक्षात घेतल्या तर बँक ग्राहक फसणार नाहीत अथवा त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही.

बँकेत अकाऊंट काढतो, तेव्हा त्यात वेगवेगळे प्रकार आहेत. नोकरदार सॅलरी अकाउंट ओपन करतात तर सर्वसामान्य बँक ग्राहक सेविंग अकाउंट ओपन करतात. व्यापारी वा व्यावसायिक बँकेत दररोज मिळणाऱ्या रकमेतून करंट अकाउंट ओपन करतात. कुणी पेन्शनसाठी बँक अकाऊंट ओपन करते तर विद्यार्थी त्यांची स्कॉलरशिपची सुविधा प्राप्त करण्यासाठी बँक खाते उघडतात. बँक अकाऊन्टमध्ये आपला पैसा सुरक्षित असतो, त्यावर व्याजही मिळते. परंतु काही बॅंका बंद पडल्या किंवा बँकेत घोटाळा झाला तर गुंतवलेल्या रकमेचे काय करायचे असा प्रश्न सर्वांनाच सतावतो. याचसाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने ‘डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बँक्स 2022’ या नावाने गत वर्षी एक यादी जारी केली होती. या यादीत देशातील सुरक्षित, खात्रीलायक बँकांची नावे नमूद केलेली आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI च्या देशांतर्गत प्रणालीगत अति महत्त्वाच्या बँक यादीत दोन व्यावसायिक (खासगी ) बँका आणि एक सार्वजनिक बँक (D-SIBs) यांचा समावेश केला. आरबीआयच्या ‘डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बँक्स 2022’ या यादीत 2022 साली काही महत्वाच्या बँकांची नावे देखील नमूद आहेत. यासोबत त्या बँकांच्या गत वर्षातील डेटाही देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील कोणत्या बँका सर्वात सुरक्षित आणि सर्वात विश्वासार्ह आहेत, त्याची यादी आम्ही देत आहोत. रिझर्व्ह बँकेने SBI आणि ICICI बँकेला D-SIB म्हणून नियुक्त केले आहे.

SBI आणि ICICI बँकेसह HDFC बँकेकडून जमा केलेल्या अधिकृत डेटानुसार, ते डी- एसआयबी म्हणून वर्गीकृत करण्यात आले. SIB या ‘सुरक्षित’ संस्था मानल्या जातात. SIB या वर्गीकरणात सूचीबद्ध झाल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी या बॅंका सुरक्षित मानल्या जातात. त्या बँकांच्या आर्थिक हलाखीच्या काळात सरकारी मदत मिळू शकते. या बँकांना आर्थिक धोका नसल्याने व त्यासाठी कडक नियम त्या बॅंका पाळत असल्याने त्यांच्यावर ग्राहक विश्वास ठेवतात व या बँका मार्केटमध्ये चांगला फायदा करू शकतात. या वरील नमूद तीन बँका, भारतातील काही सर्वात प्रभावशाली बँका मानल्या जात आहेत. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे या सूचीबद्ध बँकांकडे विशेष लक्ष आहे. या बॅंका योग्य व प्रामाणिकपणे कामकाज करीत असल्याची खात्री मिळते. सदर बॅंका सुरक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी आरबीआयने त्यांच्यासाठी कडक नियमावली आखून दिली, त्यातील निकषांमध्ये या बँका लायक ठरल्या आहेत.

दर वर्षी ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांचे वार्षिक मूल्यांकन करत असते. या वार्षिक मूल्यांकनात बँकांचे परीक्षण, कामकाज आणि सातत्यता व बँक ग्राहकांना दिलेले योगदान,निकष, नियमांची अंमलबजावणी यावर मुल्यांकन करते. त्यानंतरच भारतातील महत्त्वाच्या बँकांची यादी तयार केली जाते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2015 पासून भारतीय वित्तीय प्रणाली आणि अर्थव्यवस्थेतील गंभीर बँकांची यादी जारी केली आणि त्यांचे बारकाईने परीक्षण केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारतातील सर्वात लक्षणीय बँकांची यादी संकलित करण्यासाठी दरवर्षी ऑगस्टमध्ये बँकांचे वार्षिक मूल्यांकन करते. हे मुल्यांकन करताना येथे फक्त तीन वित्तीय संस्थांचे प्रतिनिधित्व केले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सूचिबद्ध केलेल्या बँका दिवाळखोरीत जात नाहीत, वेळ पडल्यास अशा बँकांना सरकार मदत करते. त्यामुळे अशा बँका खात्रीलायक असतात आणि ग्राहकांना बँकिंग क्षेत्रात दिलासा देतात.