‘साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो’; ब्राह्मण महासभेने विरोध केलेल्या दिब्रिटो यांना शरद पवारांचा पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राम्हण महासभेने विरोध केला आहे. दिब्रिटो यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड आम्हला मान्य नसल्याचे ब्राम्हण महासभेकडून सांगण्यात येत असताना शरद पवार यांनी दिब्रिटो यांच्या अध्यक्ष म्हणून निवडीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान आज उस्मानाबाद येथे ना. धों. महानोर यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे.

आजच्या उदघाटनानंतर शरद पवार यांनी याबाबत ट्विटरवर आपली प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. आपल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणतात कि, ”साहित्याला जात-धर्म-पंथ नसतो, हे मराठवाड्याच्या मातीने दाखवून दिले आहे. ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड याच परंपरेला धरून आहे. मला ह्या निवडीने सार्थ समाधान वाटले.”

पुढे आपल्या आणखी एका ट्विटमध्ये शुभेच्छा देताना शरद पवार म्हणाले कि, ”९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी कष्ट घेणाऱ्या संयोजकांना, साहित्यिक मंडळींना, साहित्य रसिकांना मी संमेलन यशस्वीतेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो! तसेच ” मराठवाडा साहित्य परिषद,शाखा उस्मानाबादच्या वतीने दिनांक ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १० ते १२ जानेवारी दरम्यान संत गोरा कुंभार यांची जन्मभूमी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात होत असल्याचा मला मनापासून आनंद आहे. याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष धन्यवाद द्यावयास हवेत.” असं सांगत त्यांनी याबाबतचे एक पत्रसुद्धा पोस्ट केलं आहे.

 

 

Leave a Comment