हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp : आपल्या दररोजच्या जीवनात आपल्याला अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी तातडीच्या पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत काही वेळा पैशांची व्यवस्था करणे अवघड जाते. मात्र आता यासाठी आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता आपल्याला एका क्षणात WhatsApp वर कर्ज घेता येऊ शकेल. तसेच यासाठी आपल्याला कोणतीही कागदपत्रे देखील द्यावे लागणार नाहीत कि कोणताही फॉर्म देखील भरावा लागणार नाही. इथे हे लक्षात घ्या कि, फिनटेक कंपनी असलेल्या CASHe कडून भारतीय युझर्सना व्हॉट्सअॅपवर इन्स्टंट लोन दिले जाते आहे. यासाठी, कंपनीने अलीकडेच चॅटबॉट सोल्यूशन प्रोव्हायडर Jio Haptik सोबत भागीदारी देखील केली आहे.
आता युझर्सना जास्त काही न करता WhatsApp द्वारे अवघ्या 30 सेकंदात सहजपणे कर्ज मिळू शकेल. इथे हे लक्षात घ्या की, KYC पूर्ण करण्यासाठी CASHe ची स्वतःची एक सिस्टीम आहे. यात Jio Haptik एडवांस्ड कन्वर्सेशनल कॉमर्स कॅपेबिलिटीची सुविधा दिली जाते. युझर्सचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंपनीकडून त्यांना सहजपणे कर्ज मिळू शकेल.
यामध्ये बॅकग्राउंड चेक करण्यासाठी CASHe ला फक्त युझर्सच्या नावाची आवश्यकता भासेल, जे त्याच्या पॅन कार्डवर रजिस्टर्ड असेल. तसेच कर्ज घेण्यासाठी युझर्सना व्हॉट्सअॅप वरील डेडिकेटेड नंबरद्वारे CASHe शी कनेक्ट करावे लागेल.
50,000 हून जास्त युझर्सनी घेतले कर्ज
CASHe द्वारे, WhatsApp युझर्सना एक अतिशय सोयीस्कर अनुभव मिळेल. या संदर्भात, CASHe चे को-फाउंडर आणि चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर असलेल्या स्वपन राजदेव यांनी सांगितले की,” कंपनी व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर लाईव्ह झाल्यापासून, CASHe कडून 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 50,000 क्रेडिट लाइन जारी केल्या गेल्या आहेत.”
CASHe मध्ये कसे सामील व्हावे ???
राजदेव पुढे म्हणाले की,” या दोन्ही कंपन्यांमधील या भागीदारीतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ज्या युझर्सला क्रेडिटची आवश्यकता आहे त्यांना यापुढे प्लॅटफॉर्म सोडावे लागणार नाही. तसेच, युझर्सना व्हॉट्सअॅपवर CASHe द्वारे सहजपणे इन्स्टंट क्रेडिट मिळू शकेल.” व्हॉट्सअॅप चॅटबॉट हे तरुण व्यावसायिकांसाठी वन-स्टॉप, एंड-टू-एंड सॉल्युशन आहे. युझर्स +918097553191 या WhatsApp नंबरवर CASHe शी कनेक्ट करू शकतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cashe.co.in/whatsapp-loan/
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या 3 वर्षांत ‘या’ टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सने दिला 3,900% रिटर्न
आता WhatsApp वर मिळवा SBI च्या सेवा, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
Stock Tips : ‘हे’ 5 स्टॉक भविष्यात देऊ शकतील 45% पर्यंत रिटर्न, जाणून घ्या टार्गेट प्राइस
Investment Tips : आपल्या मुलीच्या भविष्यासाठी अशा प्रकारे तयार करा 65 लाखांचा फंड
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये दररोज फक्त 50 रुपये जमा करून मिळवा 35 लाख रुपये