नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे सॅलरी अकाउंट उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या बँकेतून सॅलरी अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउयात घेऊयात.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांना होम लोन, एज्युकेशन लोन, कर लोन आणि पर्सनल लोनवर सूट देते. याशिवाय अनेक प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात.
20 लाखांपर्यंत लोन मिळेल
ग्राहक गरजेनुसार बँकेच्या कस्टमाइज्ड पर्सनल लोन प्रॉडक्टचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन (टर्म लोन) त्वरित उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत कमी कागदपत्रे द्यावी लागतील. पगारदार ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या या पर्सनल लोन प्रॉडक्ट्सना कोणत्याही सिक्योरिटी किंवा गॅरेंटीची आवश्यकता नाही.
कर्जाचा लाभ कोणा-कोणाला मिळेल ?
>> कस्टमाइज्ड पर्सनल लोन साठी, ग्राहकाचे कोणत्याही शाखेत सॅलरी अकाउंट असणे आवश्यक आहे.
>> मिनिमम नेट मंथली सॅलरी 15,000 रुपये असावी.
>> लोनसाठी अर्ज करणारी व्यक्ती केंद्र, राज्य किंवा निम-सरकारी, केंद्र किंवा राज्य PSU, कॉर्पोरेट किंवा राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांची कर्मचारी असावी.
>> कर्ज अर्जदाराचे वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असावे.
व्याजदर काय आहेत ?
या कर्जाचा व्याजदर 9.60 टक्क्यांपासून सुरू होऊन 11.10 टक्के प्रतिवर्ष असेल. यामध्ये ग्राहकांना कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे.
ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध
बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधाही उपलब्ध आहे. या सुविधेत ग्राहकांना 2 महिन्यांची सॅलरी ऍडव्हान्स मिळते.