हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा अचानक पैशाची गरज भासते. अशा वेळी लोकं पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. मात्र बँकांकडून यावर प्रचंड व्याज आकारले जाते. नियमित उत्पन्न असलेल्या लोकांसाठी हा व्याजदर कमी केले जाईल. मात्र जर आपले नियमित उत्पन्न नसेल तर पर्सनल लोन मिळवण्यात अडचणी येऊ शकतील. तसेच जर आपल्याकडे सोने असेल तर आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता फिजिकल गोल्डव्यतिरिक्त डिजिटल गोल्डवरही लोन उपलब्ध आहे.
तसेच आता डिजिटल गोल्डवर लोन घेणेही फार सोपे झाले आहे. हे जाणून घ्या कि, 2021 मध्ये शिवालिक स्मॉल फायनान्स बँके (SSFB) कडून देशात पहिल्यांदा ही सुविधा सुरु करण्यात आली. बँकेने डिजिटल गोल्डवर कर्जाची सुविधा देण्यासाठी फिनटेक फर्म इंडियागोल्डशी भागीदारी केली होती. Digital Gold
किती कर्ज मिळेल ???
याद्वारे ग्राहकांना 60,000 रुपयांपर्यंतचे इंस्टसन्ट लोन मिळेल. यासाठी ग्राहकांना डिजिटल पद्धतीने ठेवलेले सोने वापरता येईल. तसेच कर्जाची परतफेड केल्यावर ग्राहकांना नवीन कर्ज घेण्याचा किंवा त्यांचे सोने परत मिळवण्याचा पर्याय देखील असेल. Digital Gold
1% व्याजाने मिळेल कर्ज
तसेच या कर्जाची परतफेड केल्यावर, ग्राहकांना नवीन कर्ज घेण्याचा किंवा घरपोच सोने मिळवण्याचा पर्याय उपलब्ध असेल. डिजिटल गोल्डवरील कर्जासाठी मासिक व्याजदर 1% पासून सुरू होईल Digital Gold
अवघ्या 2 मिनिटांत मिळेल कर्ज
या प्रक्रियेत, अवघ्या 2 मिनिटांत कर्ज उपलब्ध होईल. तसेच त्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्कदेखील भरावे लागणार नाही. ग्राहकांना सोन्याच्या मालमत्तेवर कर्ज घेण्यासाठी शाखेतही जाण्याची गरज नाही. Digital Gold
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/loans/gold-loan
हे पण वाचा :
Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे दर घसरले, पहा आपल्या शहरातील आजचे नवे दर
शिक्षणासाठी ‘या’ सरकारी बँकांकडून सर्वात कमी व्याजदराने मिळेल Education Loan
Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या
Ration Card शी आधार लिंक करण्याला मिळाली मुदतवाढ, जाणून घ्या त्यासाठी प्रक्रिया
Stock Market : आता भारतात बसून अशा प्रकारे अमेरिकन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तपासा