सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं; हिवाळी अधिवेशनात सुप्रिया सुळेंची मागणी

supriya sule
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्या या मुद्द्यावर विचार करून राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल का? पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आजच्या अधिवेशनात सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, महाराष्ट्रसह माझा मतदार संघ म्हणजेच बारामतीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जास्त पाऊस किंवा दुष्काळामुळं शेतकरी चिंताग्रस्त आहे. दूध दरवाढीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्याने प्रस्ताव पाठवला आहे. परंतु त्याला केंद्राने तात्काळ परवानगी द्यावी. सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. हवामान बदलावर आपण सर्वांनी काम करायला हवे. तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरकारनं कर्ज माफ करावे.

दरम्यान, रविवारी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. त्यानंतर लगेच आज पासून हिवाळी अधिवेशनाला देखील सुरुवात झाली. त्यामुळे, विरोधाकांनी तीन राज्यातील पराभवाचा राग काढू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले. सध्या राजकीय वर्तुळात घडत असलेल्या घडामोडी पाहून सर्वांचे लक्ष आज पासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे. अशातच सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. ही मागणी राज्य सरकारने मान्य केल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.