हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शांघाय शहरामध्ये लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे लोकांना घरातच कैद राहावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शांघाय शहरात एका आठवड्यापेक्षा जास्त दिचसांपासून लाॅकडाऊन आहे. येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या इमारती ताब्यात घेऊन त्याचे आयसोलेशन सेंटरमध्ये रूपांतर केले आहे. हे सेंटर्स माणसांनी खचाखच भरले गेले आहेत.
25 लाख लोकं असलेल्या या शहरामध्ये अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघायला सध्या गेल्या दोन वर्षांतील सर्वांत भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येथील अनेक व्यवसाय आणि कारखाने ठप्प झाले आहेत. शिवाय रस्ते देखील ओस पडले आहेत. पश्चिम शांघायमधील एका ऑफिस बिल्डिंगला आयसोलेशन सेंटरमध्ये बदलण्यात आले आहेत. जिथे 100 पेक्षा जास्त लोकांना ठेवण्यात आले आहे.
या बिल्डिंगमधली परिस्थिती इतकी खराब आहे कि कोणत्याही सध्या सोयी देखील नाही. या आयसोलेशन सेंटरमध्ये फक्त चारच बाथरूम आहेत , जिथे एकही शॉवर नाही. यासोबतच इथे नाश्त्यासाठी फक्त साधा ब्रेडच मिळतो आहे. एकीकडे जगातील अनेक देश निर्बंध हटवत असताना चीन मोठ्या प्रमाणावर आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करत आहे. यासोबतच चीन आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत असून त्यांना जबरदस्तीने पकडून घरात कोंडून ठेवत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल झालेल्या लिओना चेंग नावाच्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने सांगितले की, येथील नर्स आणि डॉक्टर इतके व्यस्त होते की तिला कोणतीही मदत मिळवणे अवघड जात होते. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नाही तर येथील पोर्टेबल टॉयलेटही लवकरच भरत होते आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा टॉयलेटचा वापर करावा लागू नये म्हणून तिने अनेक दिवस पाणी पिणे बंद केल्याचे चेंगने सांगितले.
भारतातही कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याने चिंता वाढली
भारतात पटना येथे कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. तिसर्या लाटेतील कोरोना व्हेरियंटोेक्षा हा नवा व्हेरियंट 10 पट अधिक भयंकर असल्यानं सर्वांचिच चिंता वाढली आहे. गुरुवारी बिहारच्या पटना येथे कोरोनाव्हायरसचा एक नवीन व्हेरियंट (BA.12) सापडला आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (IGIMS) मध्ये ओमिक्रॉनचे नवीन प्रकार आढळून आले असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये नमुद करण्यात आलं आहे. BA.12 हा व्हेरियंट तिसर्या कोरोना लाटेट सापडलेल्या BA.2 या व्हेरियंट पेक्षा 10 पट जास्त धोकादायक आहे.