वृत्तसंस्था । सद्यस्थितीत भारतातील ‘कोव्हिड १९’च्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी एका अभ्यासाद्वारे मांडले आहे.
कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू केल्यानं कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग मंदावला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते आता १० दिवसांवर गेले आहे. त्यामुळे सध्या जरी देशात रुग्णसंख्या वाढत असली, तरी १६ मेनंतर भारतात ‘कोव्हिड १९’चा रुग्ण आढळणार नाही, असा निष्कर्ष या अभ्यासाद्वारे मांडण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार, ३ मेपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कदाचित दीड हजार रुग्ण रोज वाढतील. १२ मे रोजी ही संख्या १ हजारपर्यंत खाली येईल आणि १६ मेनंतर एकही नवा रुग्ण आढळणार नाही, असा दावा करण्यात आला आहे.पॉल यांनी नुकतेच त्याचे सादरीकरण केले. राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्थेच्या संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) काही प्रतिनिधींनी मांडलेल्या अभ्यासाद्वारे हा निष्कर्ष समोर आला आहे. यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”