कोरोना वाढला!! नागपूर नंतर आता ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाउन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून निर्बंध घालून देखील रुग्णसंख्या कमी येत नाही. याच पार्श्वभूमीवर आता नागपूर नंतर परभणी जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन (Lokcdown) जाहीर करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे 13 आणि 14 मार्च हे दोन दिवस परभणी जिल्हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील.

परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. यापूर्वी नागपूरमध्ये सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रोज 10 हजार कोरोना रुग्ण सापडत असून महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment