हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवणं गरजेचं असल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं. देशावर कोणतही संकट आल्यानंतर महाराष्ट्र नेहमीच दिशादर्शक भूमिकेत राहिला असून आताही तीच वेळ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवून काही महत्वाच्या गोष्टींवर १४ तारखेपपर्यंत निर्णय कळावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
आमचं तोंड बंद करायची हिंमत आतापर्यंत कुणाची झाली नव्हती पण एका विषाणूने ते काम केलं आहे. देशभरात संचारबंदी लागू केल्यानंतर कोरोनाला अटकाव आणता येईल असं वाटलं होतं, पण काही कारणांनी ते आपल्याला शक्य झालं नाही. आता कोरोना आपल्याकडे येण्याआधी आपणच लोकांकडे पोहचून कोरोनाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. कोरोनाचा अधिक परिणाम कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या आणि इतर आजारांचा त्रास असलेल्या लोकांवर होत असून त्या लोकांना अधिक जपण्याची गरज आहे.
संपूर्ण देशातील राजकीय पक्ष एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढत असून हरलेल्या मानसिकतेने लढून आता चालणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जनतेला धीर दिला.