राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील लॉकडाऊन ३१ मार्च च्या मध्यरात्री पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1261927931657351169

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवल्याचा अध्यादेश जारी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं. त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबतचे नवे नियम अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबतच्या केंद्राच्या गाईडलाइन न आल्याने राज्यातील नवी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल माहिती दिलेली नाही. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment