हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ आहे. असं विधान काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.महाराष्ट्रात संख्या जास्त असूनही व्यापारी, गरिबांचा विचार करत आहोत. त्यामुळे सगळ्यांचं एकमत घेऊन पुढची दिशा निश्चित करायची आहे असे ते म्हणाले.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून लॉकडाऊनची तयारी सुरू आहे. याबाबत अस्लम शेख याना विचारलं असता त्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले.
केंद्र सरकारने चांगले पॅकेज द्यावे. त्यापाठोपाठ आम्हीही देऊ अस म्हणत मुंबई आणि महाराष्ट्रातच का रुग्ण आढळत आहेत? याबाबतही शोध घ्या. असे ते म्हणाले. काहीच्या राज्यांमध्ये निवडणुका होताहेत. लाखो लोक जमत आहेत. पंतप्रधान मोदी लाखोंना संबोधित करत आहेत. मग मुंबई आणि महाराष्ट्रात कसे रुग्ण वाढत आहेत. मराठी माणसाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की आणखी दुसरं कारण आहे? ते शोधण्याबाबत टास्क फोर्सला सांगितलं आहे. असं अस्लम शेख यांनी म्हंटल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group