नवी दिल्ली |१७ व्या लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. या मतदानानंतर आज सर्व माध्यमांचे एक्सिट पोल येणार आहेत. त्याआधीच काँग्रेस आणि भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठीची चुरस चांगलीच रंगात आली आहे. भाजपने आपल्या नव्या शपथविधीची तारीख निश्चित केली आहे. तर काँग्रेसने विरोधी दलांच्या नेत्यांसोबत चर्चा करून पंतप्रधान पदासाठी नेता निवडीच्या घडामोडीला वेग आणला आहे.
२०१४ सारखी आता परिस्थिती राहिली नसल्याने अनेक नेत्यांच्या मनात पंतप्रधान पदाची मनीषा जागी झाली आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सर्व विरोधी पक्षातील नेत्याच्या घेण्यास सुरुवात केली आहे. चंद्राबाबूनी आतापर्यंत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, मायावती, एम.के स्ट्रॅलीन या बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे आता २३ तारखेला निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लाजले आहे.
तर तिकडे भाजपच्या गोटात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या शपत विधीची तारीख निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१४ साली शपथ घेतलेल्या २६ मे या तारखेला नवीन मंत्रीमंडळ शपत घेण्याची शक्यता आहे. तसेच २६ तारखेला शपत विधी काही कारणाने टळला तर २८ मी रोजी शपतविधी घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकांची जयंती आहे. त्यामुळे यादिवशी शप्तविधी घेतला जाऊ शकतो. नरेंद्र मोदी यांच्या शपतविधीला अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच पाकिस्तानला शह देण्यासाठी अनेक मुस्लिम राष्ट्रांच्या प्रामुख्यांना या कार्यक्रमाला आमंत्रीत केले जाण्याची शक्यता आहे.