#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हातकणंगले प्रतिनिधी|२०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या साथीने लढून विजयी ठरलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात प्रचार केला आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडी सोबत हातमिवणी केली. त्यांची हीच कृती शेतकरी मतदाराच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांनी मतदान केले आहे.

आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता

राजू शेट्टी ज्या जात समूहातून येतात त्या जात समूहातील काही लोकांनी जातीवाचक मजकूर सोशल मीडियात टाकला. तसेच हा मजकूर प्रदर्शित करणारे राजू शेट्टी यांच्या अत्यंत जवळचे असल्याचे देखील सोशल मीडियातून उजेडात आणले गेले. त्यामुळे एक मोठा जात समूह राजू शेट्टी यांच्यावर नाराज झाला. त्याचा परिणाम म्हणून राजू शेट्टी यांच्या मतात घट झाली.

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

जयंत पाटील यांचे वलय असणाऱ्या वाळवा-इस्लामपूर भागात जयंत पाटील हे राजू शेट्टी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे नाहीत असे वातावरण विरोकांकडून जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आले. त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या धर्यशील माने यांना झाला. एकंदरच व्हिव्ह रचना करून चांगली लढत देण्यात महाआघाडी यशस्वी झाली मात्र मतदारांनी नेमके कोणाच्या पारडयात विजय टाकला आहे. याचा तंतोतंत अंदाज सध्या तरी लावता येणार नाही. यासाठी २३ मे ची वाट बघणे उचित ठरणार आहे.

पंतप्रधान : अब कि बार, शरद पवार

राजू शेट्टींवर टीका नकरता आपले विकासाचे व्हिजन लोकांसमोर ठेवणारा शिवसेनेचा तरुण उमेदवार लोकांच्या पसंतीला पडला. तर या मतदारसंघात मराठा विरुद्ध जैन असे मतदान झाल्याची देखील चर्चा आहे. याचाच अर्थ कास्ट फॅक्टर या मतदारसंघात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. कोल्हापूरातील जनता शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार असल्याचे वारे हातकणंगले मतदारसंघात देखील वाहू लागले होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि हातकणंगले मतदार संघातील मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले असण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.

Supriya Sule यांच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

हयातभर ज्या कारखानदार नेत्यांशी लढा देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लढणारा लढवय्या शेतकरी नेता कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसू लागल्याने लोकांच्या मनात राजू शेट्टी यांच्या बद्दल राग होता. तो देखील राग मतदानातून बाहेर आला असणार आहे. तर राजू शेट्टी यांच्या विरोधात राजू शेट्टी नावाचाच डमी उमेदवार उभा राहिला होता. त्या डमी राजू शेट्टीचे चिन्ह हे स्वाभिमानीचे गत निवडणुकीतील शिट्टी हे होते. तर त्याचा बॅलेट पेपर वरील अणुक्रमांक ६ होता. तर स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांचा अणुक्रमांक ७ होता. त्यामुळे डमी उमेदवार राजू शेट्टी यांचे बरेच मताधिक्य छाटू शकतो. एकंदरच हातकणंगले मतदारसंघात उलट सुटल अंदाज वर्तवले जात असले तरी येत्या २३ तारखेला निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

1 thought on “#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?”

Leave a Comment