Wednesday, June 7, 2023

बारामती : लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना लोक निवडणुकीत उद्ध्वस्त करतील

बारामती प्रतिनिधी |हि निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष तर  लक्ष लागलेच आहे. त्याच प्रमाणे जगाचे देखील लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.त्यामुळे लोकशाहीला उद्ध्वस्त करणाऱ्याला लोक या निवडणुकीत उद्ध्वस्त करतील असे शरद पवार म्हणाले आहेत ते बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलत  होते.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवट आज झाला त्यावेळी शरद पवार  यांनी आपल्या होम ग्राउंड असणाऱ्या बारामतीत प्रचाराचा शेवट केला. शरद पवार या मतदारसंघातून ज्यावेळी निवडणूक लढत असत त्यावेळी ते शेवटची  सभा बारामती मध्ये घेत असत. तीच परंपरा शरद पवार  यांनी आजही कायम ठेवली आहे.

शरद पवार यांच्या भाषणाचा रोख नरेंद्र मोदी यांच्यावर होता. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. त्याच प्रमाणे सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन देखील उपस्थित जनतेला केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या समोर भाजपच्या कांचन कुल यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.