धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ (उत्तर प्रदेश ) |रागाचे आपण अनेक प्रकार पहिले असतील मात्र हा प्रकार कहर बनून एका जीवावर बेतला. त्याच्या सोबत जीवनासाथी म्हणून आणा भाका वाहिल्या होत्या. त्यानेच तिला यम सदनी पाठवले आहे. उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील तरवनिया या गावी आपल्या पत्नीने भाजपला मत दिले म्हणून तिला फावड्याने ठेचून मारण्याचा प्रकार घडला आहे.

रामबचन असे खून करणाऱ्या पतीचे नाव असून नीलम असे त्याच्या पत्नीचे नाव होते. नीलमच्या माहेरच्या माणसांनी या संदर्भात पोलीस फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार नीलम यांचा पती तिला हुंड्यासाठी छळत होता. भाजपला मत दिले म्हणून त्याचा राग या छोट्या कारणातून बाहेर पडला आणि त्याने पत्नीची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नीमध्ये मत कुणाला द्यायचं यावरून वाद झाला. पती बसपाला मत दिलं पाहिजे या मताचा होता. तर, पत्नीला भाजपला मत द्यायचं होतं. पतीच्या सांगण्यावरून देखील नीलमनं भाजपला मत दिलं. त्यानंतर रागानं लाल झालेल्या पतीनं फावड्यानं पत्नीची हत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर रामबचन तिथेच उभा झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी गोळा झाली. त्यानंतर रामबचन तिथून निघून गेला.