राहुल गांधींचा थोरांतांच्या घरी केला मुक्काम ; विखेंवर कारवाइ करण्याची झाली चर्चा?

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संगमनेर प्रतिनिधी |शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी काल संगमनेर या ठिकाणी सभा घेतली. सभा संपल्या नंतर राहुल गांधी  यांनी बाळासाहेब थोरात यांच्या घरी मुक्काम केला. त्यावेळी राज्याच्या स्थिती बाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

पक्षविरोधी काम करणाऱ्या  राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काय कारवाई करावी या बाबत देखील राहुल गांधी यांनी बाळासाहेब थोरात यांच्या सोबत विचार विनिमय केला  आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्यावेळी संगमनेर मध्ये राहुल गांधी यांची सभा सुरु होती. त्याच वेळी राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार करत होते.

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

राधा कृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपली राजकीय भूमिका आज स्पष्ट करण्याची  शक्यता आहे.  राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेत जाणार कि भाजपमध्ये जाणार या बाबत सर्वत्र चर्चेला उत आला आहे. त्यामुळे विखे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याबबात सर्वांनाच उत्सुकता आहे.

पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ