हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संसदेमध्ये सुरक्षिततेच्या संदर्भात झालेल्या चुकीमुळे बुधवारी दोन तरुणांनी लोकसभेत येऊन गोंधळ घातला. या प्रकरणामुळेच काँग्रेसच्या पाच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. सभागृहात असभ्यवर्तन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता इथून पुढे त्यांना हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होत येणार नाही.
कोणत्या खासदारांवर कारवाई
लोकसभेमधून टीएन प्रथापन, हीबी एडेन, एस जोथीमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस अशा पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी लोकसभेच कामकाज सुरू झाल्यानंतर या खासदारांनी सरकारला टार्गेट करत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सभागृहातील वातावरण आणखीन विस्कळीत झाले. यानंतरच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संसदेत काय घडलं?
बुधवारी संसदेमध्ये कामगार सुरू असताना दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकावर येऊन उड्या मारू लागले. यानंतर त्यांनी घोषणाबाजी करत धुराच्या कांड्या सभागृहात सोडल्या या सर्व घटनेमुळे संसदेत चांगलाच गोंधळ उडाला तसेच सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. सध्या या सर्व प्रकार नाला गांभीर्याने घेऊन लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या पाच खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे.