Lok Sabha Voting Maharashtra : महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला मतदान?? पहा संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. यंदा देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार असून त्याची सुरुवात १९ एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया (Lok Sabha Voting Maharashtra) पार पडणार आहे. त्यातील पहिला टप्पा 19 एप्रिलला असेल तर पाचवा टप्पा 20 मे ला असणार आहे. आज आपण जाणून घेऊया कोणत्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या दिवशी कुठे मतदान होणार?? Lok Sabha Voting Maharashtra

पहिला टप्पा (19 एप्रिल)- नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर

दुसरा टप्पा (26 एप्रिल) – वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी (Lok Sabha Voting Maharashtra)

तिसरा टप्पा (7 मे) – सातारा, सोलापूर, माढा, कोल्हापूर, सांगली, रायगड, कोल्हापूर, हातकणंगले, लातूर, उस्मानाबाद, कोकण

चौथा टप्पा (13 मे)- रावेर, मावळ, पुणे, नंदुरबार, जळगाव, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, शिरूर

पाचवा टप्पा (20 मे) – मुंबईतील सहाच्या सहा जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होईल.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले कि, १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपतोय. त्यापूर्वी निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, देशात स्वतंत्र आणि निःपक्ष निवडणुका होतील. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार असून देशभरात दीड कोटी निवडणूक अधिकारी आहेत. तसेच साडेदहा लाख पोलिंग बूथ आहेत. ५५ लाखांपेक्षा अधिक EVM मशीन निवडणुकीसाठी तयार आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरातू ४९ कोटी पुरुष आणि ४७ कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. यातील १.८२ कोटी मतदार पहिल्यांदाच मतदान करताना दिसतील. 18 ते 29 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. 82 लाख मतदार हे 85 वयापेक्षा अधिक आहेत. याशिवाय ४८ हजार तृतीयपंथी सुद्धा मतदानाचा हक्क बजावतील. प्रत्येक बूथवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि टॉयलेटची सुविधा असेल, विजेची सोया असेल उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी छताची सोया सुद्धा करण्यात येणार आहे. जे मतदार पोलिंग बुथवर येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी घरोघरी मतदानाची सोय करण्यात येणार आहे.