बारामती प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघाचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. बारामती मतदारसंघातून कोण विजयी होणार या बद्दल उलट सुलट अंदाज वर्तवले जात असले तरी काही वस्तूनिष्ठ बाबी लक्षात घेणे महत्वाचे ठरणार आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे याचा पराभव होणार असे निदान बऱ्याच लोकांनी आणि राजकीय पंडितांनी बांधले आहे. त्यात तथ्य देखील आहे.
विधान परिषदेच्या त्या जागी लागणार रणजितसिंह मोहिते पाटलांची वर्णी
बारामती मतदारसंघाचे सुप्रिया सुळे यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी संसदेत उत्तम कामगिरी केली. मात्र मतदारसंघात त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक सोपी राहिली नव्हती. मतदान संपन्न झाल्यावर संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला तर भोर, वेल्हे या तालुक्यता संमिश्र मतदान झाल्याचे जाणकार सांगत होते. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभा राहणार हक्काचा मतदार मागे सरकल्याचे वास्तव अगदी सूर्य प्रकाशा सारखे दिसत होते. तर खुद्द बारामती तालुक्यात देखील भाजपच्या पारड्यात मतदान पडल्याचे चित्र होते. तर तिकडे इंदापूरात २०१४ च्या निवडणुकीला हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केल्याचा राग मनात धरून लोकांनी कमळ हाती धरले. तर दौंड तालुक्यात भाजप राष्ट्रवादीला समसमान मतदान झाल्याचे देखील नाकारता येणार नाही. तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळणार हि तर काळ्या दगडावरची पांढरी रेष झाली आहे.
म्हणून माढा आणि सोलापूर मतदारसंघाचा निकाल लागणार उशीला
अशा सर्व परिस्थितीत बारामती वगळता दौंड ,भोर, खडकवासला, इंदापूर या चार विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पिछाडी मिळाल्यास चार विधानसभा मतदारसंघाचे लीड एकटा बारामती मतदारसंघ तोडू शकत नाही. त्यामुळे चारही विधानसभा क्षेत्रात सुप्रिया सुळे पिछाडीवर गेल्यास त्यांचा पराभव कोणीही रोखू शकत नाही.