सोलापूर प्रतिनिधी | माढा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काटे कि टक्कर सुरु असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. कारण सकाळ पासून आघाडीवर असणाऱ्या संजय शिंदे यांना मोठी आघाडी घेण्यात अपयश आले होते. तर भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देखील मोठी आघाडी घेता आली नाही.
बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला
अटीतटीच्या अशा पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अदयाप बाकी आहे. त्यामुळे इथून पुढे मतमोजणीत रंगत निर्माण होणार असून राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या ५४२३ मतांनी आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे त्यांना चांगलीच टक्कर देत आहेत.
रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता
माढा मतदारसंघाचे साधारता चारच्या सुमारास चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी या मतदारसंघात काय होणार या बद्दल निश्चित सांगता येणार नाही.