बालेवाडी प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागत आहे, सध्या भाजप देशात स्वबळावर ३०० जागा जिंकत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. तर इकडे मावळ मतदारसंघात बारामतीच्या पवार घराण्याला पहिला पराभव पाहण्यास मिळतो आहे. अशा अवस्थेत पार्थ पवार यांना पराभूत करून जे विजयाकडे कूच करत आहेत त्या श्रीरंग बारणे यांनी पवार घराण्यावर सडकूट टीका केली आहे.
माढ्यात काटे कि टक्कर ; भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर
अजित पवार यांचा भष्टाचाराचा पैसा जनतेने नाकारला आणि मला मोठे मताधिक्य दिले. लोकांनी दाखवून दिले कि आम्हाला घराणे नको आहे आम्हाला विकास हवा आहे असे श्रीरंग बारणे यांनी म्हणले आहे. तसेच त्यांनी पवार घराण्यावर देखील सडकून टीका केली आहे. ४० डिग्री तापमानात पवार घराण्याचे लोक प्रचाराला फिरत होते हाच लोकशाहीचा विजय होता असे हि श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
मावळ : पार्थ पवारांना झटका ; शिवसेनेला निर्णायक ९९ हजारांचे मताधिक्य
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे दीड लाखांच्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. त्यांच्या मताधिक्याची संख्या बघता त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. पार्थ पवार यांचा पराभव हा राष्ट्रवादीच्या राजकारणाला मोठा धक्का देणारा आहे. त्यामुळे या मतदारसंघाची सर्व माध्यमात आणि राज्यभर चर्चा आहे.
लोकसभा निकालाच्या सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती
टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी
रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता