लोणंदला 28 वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या

लोणंद | येथील राजलक्ष्मी चित्रपटगृह परिसरात राहाणाऱ्या एका 28 वर्षीय युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. युवकाने घरातील बेडरूममधे फॅनला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. गणेश मारुती वायकर (वय- 28) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस राहणारे गणेश मारुती वायकर (वय- 28) याने काल रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. घरातील बेडरूममधील फॅन बसवण्याच्या हुकाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. उपचारासाठी त्यास लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

युवकांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत ज्ञानेश्वर वाईकर यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस नाईक योगेश कुंभार हे तपास करत आहेत.

You might also like