नवी दिल्ली । राज्यसभा खासदारांनी काल संसदेत शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातील इतर सात जणांनी शपथ घेतली. भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली.त्यावरून “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता.” असं भाष्य उदयनराजे भोसले यांनी केले.
राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही, अशी प्रतिक्रिया दिल्लीतील पत्रकार परिषदेत राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते उदयनराजे यांनी दिली. . राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरुन सर्वत्र राजकारण सुरु झाले.कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला ही अफवा आहे. . याच्याएवढी लाजिरवाणी गोष्ट असू शकत नाही. असू शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले.
“माझा स्वभाव पाहता, मी महाराजांबद्धल काहीही ऐकून घेईन असं वाटतं का? या सभागृहाचा चेअरमन मी आहे,इथे अश्या कोणत्याही घोषणा द्यायला मनाई आहे. अश्या कोणत्याही घोषणा राज्यघटनेला धरुन नसल्याचं व्यंकय्या नायडूं यांनी सांगितलं. शरद पवारसाहेब पण तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा. जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, आणि चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नका . ही माझी हात जोडून विनंती आहे, हा आक्षेप कांग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला. ” असे उदयनराजे म्हणाले.
राज्यसभा खासदारांनी काल शपथ घेतली . उदयराजेंनि शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर ” सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ असं व्यंकय्या नायडू म्हणाले.